धक्कादायक! बिग बाजारच्या मागे घातक रसायनांची विल्हेवाट, तपास करताना पोलिसांना आढळला खड्ड्यातील साठा

जळगाव :  येथील बिग बाजारच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मानवी जीवनास घातक असलेल्या केमिकल्सची खड्डा करुन विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार शुक्रवार, १९ रोजी सायंकाळी उघडकीस आला. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्तरित्या घटनास्थळी धाव घेतली. केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, त्याचा मालक कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने केमिकल्स व मातीचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहे.

असा लागला छडा
दोन दिवसापूर्वी गोविंदा रिक्षा थांब्याजवळ एका तरुणावर चॉपर हल्ला झाला होता. या गुन्ह्याशी जेथे जेथे संबंध आला, तेथे तपास करताना पोलीस संशयिताला घेऊन घटनास्थळी गेले असता तेथे दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी ही माहिती महानगरपालिकेला दिली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी व मनपाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथे भल्या मोठ्या खड्ड्यात केमिकल्स साचलेले दिसले तर मातीतूनही दुर्गंधी येत होती. प्रदुषण नियंत्रण महामंडळाशी संबंधित प्रकार |असल्याने उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनघही बोलावण्यात आले. याच ठिकाणी सर्कस येणार असल्याने जेसीबीद्वारे जागा सपाटीकरण सुरु होते,

त्या मातीतही केमिकल्स मिसळल्याचे उघड झाले
उद्या देणार नोटीस हे केमिकल्स कोणत्या कंपनीचे आहे, त्याचा शोध घेऊन शनिवारीच कंपनी व्यवस्थापनाला नोटीस बजावली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत यांनी दिली. कंपन्याम धून निघणारे घातक केमिकल्सची पुण्यात शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. जळगाव विभागातून हे निघणारे केमिकल्स घेऊन विल्हेवाट लावण्यासाठी टेक्नो असोसिएटस् या कंपनीला प्राधिकृत केले आहे. शनिवारीच संपूर्ण माती व केमिकल्स टँकरमधून पुण्यात नेले जाणार असल्याचे राजपूत यांनी सांगितले.