मोठी बातमी । १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग सक्तीचे

#image_title

FASTag mandatory for all vehicles in Maharashtra : राज्यातील सर्व वाहन धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून हा नवा नियम लागू होणार आहे. त्यामुळे येत्या एक एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. यासह शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-२०१४ मध्ये सुधारणा केली जाणार आहे.

फास्ट टॅगसंदर्भात शासन निर्णय फडणवीस सरकार जारी करेल. त्यात सर्व चारचाकी वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य असेलच पण दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसदर्भात या जीआरमध्ये काही निर्णय असेल का हेही लवकरच कळणार आहे.

WhatsApp Image 2025 01 02 at 44546 PM 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालीलप्रमाणे:

१) शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-२०१४ मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
१ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य

२) महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)
– शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
– मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी

३) ई-कॅबिनेट सादरीकरण होणार, यापुढे मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस होणार, आजच्या सादरीकरणानंतर ई-कॅबिनेट धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.