काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! सात नगरसेवकांचे थेट निलंबन

---Advertisement---

 

महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली असून, जालना महापालिकेतील सात नगरसेवकांना पक्षाने थेट निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसने कठोर भूमिका घेत ही कारवाई केली आहे.


पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन करत भारतीय जनता पक्षाला उघडपणे साथ दिल्याचा ठपका संबंधित नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) अॅड. गणेश पाटील यांनी दिली.


माहितीनुसार, २ मार्च रोजी महापालिकेतील स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीदरम्यान संबंधित नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप आहे. पक्ष शिस्तीचा भंग झाल्याचे मानून काँग्रेसने याबाबत चौकशी केली होती. चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.


पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत संबंधित नगरसेवकांचे निलंबन कायम राहणार आहे. या निर्णयामुळे जालना महापालिकेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निलंबित करण्यात आलेले नगरसेवक :
फारूक सादिक तुंडीवाले, इमरान खान, अमानुलला खान, फरहाना रऊफ अन्सारी, सुशील अशोक बोरडे, मयुरी दिनेश वेणे, रुबीना मजीद पठाण आणि अनिल अशोक तिरुखे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---