ऑनलाईन पेमेंट (UPI) होणार स्लो होणार? डिजिटल फ्रॉड रोखण्यासाठी मोठं पाऊल; RBI चे 5 नवे नियम जाहीर…!

---Advertisement---

 

देशात वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. RBI ने UPI आणि डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी 5 महत्त्वाचे नियम प्रस्तावित केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या प्रस्तावांमध्ये सर्वात महत्त्वाचा ‘किल स्विच’ फीचर आहे. यामुळे ग्राहकाला संशयास्पद व्यवहार दिसल्यास एका क्लिकवर UPI, नेट बँकिंग आणि कार्ड सेवा तात्काळ बंद करता येणार आहे.

तसेच 10 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर 1 तासाचा वाट पाहण्याचा पर्याय लागू करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे पैसे खात्यातून कट होतील, पण समोरच्याला 1 तासानंतरच मिळतील. या दरम्यान फसवणूक लक्षात आल्यास व्यवहार रद्द करता येईल.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही विशेष सुरक्षा उपाय सुचवण्यात आले आहेत. 70 वर्षांवरील नागरिकांच्या मोठ्या व्यवहारांसाठी अतिरिक्त पडताळणी आवश्यक ठरू शकते. याशिवाय, बनावट खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खात्यांची क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाईल. संशयास्पद रक्कम ‘शॅडो बॅलन्स’मध्ये ठेवली जाऊ शकते.

मोठ्या व्यवहारांसाठी मल्टी-लेयर ऑथेंटिकेशनही अनिवार्य होणार आहे. म्हणजे केवळ OTP पुरेसा नसेल, तर बायोमेट्रिक किंवा इतर सुरक्षा पद्धती वापराव्या लागतील. या नियमांमुळे UPI व्यवहार थोडे स्लो होऊ शकतात, मात्र फसवणूक मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. RBI ने या प्रस्तावांवर 8 मे 2026 पर्यंत नागरिकांकडून सूचना मागवल्या असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---