Bhadgaon News : भडगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित मालमत्ता कर वाढीस भाजपने नोंदविली हरकत

---Advertisement---

 

भडगाव : येथे नगरपरिषदेतर्फे मालमत्ता करात वाढीच्या नोटिस नागरिकांना देण्यात आल्या आहेत.या कर वाढी संदर्भांत नागरिकांकडून 20 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यानुसार भाजपने हरकत नोंदवून ही कर वाढ रद्द किंवा स्थगित करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भांचे निवेदन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत. यात प्रस्तावीत कर आकारणी ही महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या व महाराष्ट्र नगरपालिका एकत्रित मालमत्ता कर नियम १९६९ चे विविध कायदेशीर तरतुदींचे पालन न करता करण्यात आलेली आहे. या कारणास्तव आमची सामुहीक हरकत नोंदविण्यात यावी.

मालमत्ताधरकांना दिलेल्या प्रस्तावीत कर आकारणीत शिक्षण कर, अग्नीशमन कर व रोहयो कर प्रस्तावित कारणात आले आहेत. या कोणत्याही सुविधा भडगाव नगरपरिषद देत नसतांना कर आकारणी करणारे अन्यायकारक आहे. नगरपरिषद भडगावचे आज रोजी कोणतीही शिक्षण सेवा देणारी संस्था अस्तित्वात नाही व ती कधीही नव्हती. नगरपरिषदेच्या अस्थापनेवर अग्नीशमन सेवा देणारे कोणतेही तज्ञ व प्रशिक्षीत व्यक्तीनसल्याने ही सेवा देखील नगरपरिषदेने पुरविलेली नाही. तसेच नगर परिषद भडगाव हद्दीतील कोणत्याही कर पात्र असलेल्या व्यक्तीस रोजगार हमी योजनेचा कोणताही लाभ होत नाही. कारण नगरपरिषद भडगावमध्ये रोजगार हमी योजनेची अंमलबजावणीसाठीचा विभाग अस्थापनेवर नाही.

तसेच प्रस्तावीत कर आकारणी नोटीसीत भडगाव न.प. हद्दीतील नगारीकांच्या मालमत्तेचे कर योग्य मुल्य नमुद केलेले आहे. परंतु, नागरपरिषदेने कर योग्य मुल्य कशाचे आधारे किती क्षेत्रफळ चटई क्षेत्रावर अथवा कोणत्या दराने ? कशा पध्दतीने कर योग्य मुल्य रक्कम आकारली याबाबत आपल्या नोटीसीत काहीही नमुद नाही. तसेच भडगाव न. प. हद्दीतील नगारीकांच्या मालमत्तेचे कर योग्य मुल्य ठरवितांना मालमत्ताधारकांना कळविलेले देखील नाही. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारच्या हरकती मागविण्यात आलेल्या नाहीत आदी हरकती नोंदविल्या आहेत.

---Advertisement---

 

याप्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक सचिन चोरडिया, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र पाटील, मुन्ना परदेशी, एकलव्य संघटनेचे नेते रविंद्र शांताराम सोनवणे, प्रदीप पाटील, देविदास पाटिल, मधुकर महाजन, किरण शिंपी, विशाल चौधरी, कुणाल पाटील, निखिल कासार, परवेश खान, विश्वनाथ भोई, रवींद्र कुंभार, डिगंबर पाटील, रवींद्र प्रकाश वाडेकर, विनोद मोरे, सुर्यभान वाघ आदी उपस्थित होते.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---