कासोदा : एरंडोल येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात विवेकानंद केंद्र, योगेश्वर नागरी सहकारी पतसंस्था एरंडोल व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १२ जानेवारी रोजी रा. ती. काबरे विद्यालयाचे पटांगणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास युवकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला असून एकुण १९९ दात्यांनी रक्तदान केले.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करुन शिबिरास प्रारंभ करण्यात आला. युवक, युवती, महिला व पुरुष तसेच दिव्यांग युवकांनी सुध्दा या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला. माजी आमदार चिमणराव पाटील, प्रा.मनोज पाटील, आनंद दाभाडे, डॉ. राहुल पाटील, डॉ. पी. जी. पिंगळे कासोदा, डॉ. भानुदास येवलेकर, पुंडलिक पाटील जळगाव, बुलडाणा अर्बनचे व्यवस्थापक योगेश पाटील आदींनी शिबिरास भेट दिली.
गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र संस्थेचे डॉ. मकरंद वैद्य, डॉ. सुनील पाटील, डॉ. उज्वला पाटील, डॉ. जागृती लोहार, श्रीकांत मुंडणे, विजय कुलकर्णी, उदय सोनवणे यांचे सहकार्य लाभले.