---Advertisement---

सीरियामध्ये पुन्हा रक्तरंजित संघर्ष, ७० हून अधिक जणांचा मृत्यू

by team
---Advertisement---

रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम देश सीरिया पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. वायव्य लताकिया प्रदेशात झालेल्या हल्ल्यांमध्ये सीरियन सुरक्षा दल आणि बशर अल असद राजवटीच्या ७० समर्थकांना ठार मारले आणि २५ हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे .

या दरम्यान दोन्ही बाजूंनी रॉकेट लाँचरने हल्लाही केला. वाढत्या हिंसाचारामुळे देशात गृहयुद्धाची शक्यता वाढू लागली आहे. वृत्तानुसार, बंडखोरांनी अनेक घरांवर गोळ्या झाडल्या. त्याच वेळी, सीरियाच्या सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि असद राजवटीचे जनरल इंटेलिजेंस ऑफिसर राहत असलेल्या इमारतीवर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर त्यांना अटक करण्यात आली.

यापूर्वीच्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा ४८ होता, तर एसओएचआरने डिसेंबरमध्ये इस्लामी बंडखोरांनी असद यांना पदच्युत केल्यानंतरची ही लढाई “सर्वात हिंसक” असल्याचे वर्णन केले होते. मृतांमध्ये १६ सुरक्षा कर्मचारी आणि २८ असद समर्थक लढवय्ये होते, तर काही जखमी झाले अथवा पकडले गेले. असद काळातील कमांडर सुहैल अल-हसनशी संबंधित बंदूकधारींनी सुरक्षा गस्त आणि चौक्यांवर हल्ला केला. त्यानंतर ही चकमकी सुरू झाल्याचे वृत्त आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सरकारी सुरक्षा दलांनी लताकियातील एका गावावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ले केले.

तुर्कीने सीमेवर टँक पाठवले

सीरियातील वाढत्या अशांततेदरम्यान, तुर्की सैन्यानेही सीमेवर प्रवेश केला आहे. वृत्तानुसार, तुर्कीने मोठ्या टँकसह सीरियात आपले सैन्य तैनात केले आहे. परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे.

सीरियामध्ये पुन्हा गृहयुद्ध ?

सीरियामध्ये आधीच दीर्घकाळ गृहयुद्ध सुरू आहे, ज्यामुळे लाखो लोक विस्थापित झाले. आता सीरियन सुरक्षा दल आणि बशर अल असद राजवटीच्या समर्थकांमधील वाढत्या संघर्षामुळे पुन्हा एकदा गृहयुद्धाची भीती निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment