धक्कादायक : चार दिवसांपूर्वी मैत्रिणीसोबत खेळायला गेलेल्या चिमुकलीचा आढळला मृतदेह

चोपडा : शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात राहणारी ९ वर्षीय संजना गुड्डू बारेला चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. १७ डिसेंबर रोजी दुपारी ती मैत्रिणीसोबत खेळायला गेली होती, परंतु रात्री उशिरापर्यंत घराला परत न आल्यामुळे घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. तिचा शोध घेत असताना, १८ डिसेंबरला पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली.

गुड्डू बारेला (मूळ रा. तरडी, ता. शिरपूर) शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरात पत्नी व मुलगी संजना (९) व मुलगा अजय (१२) यांच्यासह राहत होते.  मंगळावर, १७  रोजी संजना दुपारी आईला सांगून मैत्रिणीसोबत खेळायला गेली. परंतु , ती रात्री घरी परतलीचं नाही. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध शोधा केली. मात्र, ती कुठेही मिळून आली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी शहर पोलिसात संजना हरविल्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी तिचा शोध घेतला, यासाठी त्यांनी समाज माध्यमांची देखील मदत घेतली. मात्र, ती कुठेच आढळून आली नाही.  मात्र शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास संजनाचा मृतदेह शहरातील धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीतील पाण्यात तरंगताना आढळला. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाल्याचे तपासून समोर आले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला, आणि सायंकाळी शिरपूर तालुक्यातील तरडी येथे तिचे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिक तपास करीत आहे.