भुसावळ बसस्थानक परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

---Advertisement---

 

भुसावळ : भुसावळ बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी (१३ ऑगस्ट) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, जय दिपक चावरिया (वय ३७, रा. वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे बसस्थानकावर वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१२ ऑगस्ट ) रोजी रात्री ११.३० वाजता ड्युटी संपवून घरी जाताना त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला बसस्थानकातून बाहेर काढले होते. बुधवारी (१३ ऑगस्ट) रोजी सकाळी चावरीया ९.३० वाजता ड्युटीवर असताना बिस्कीट विक्रेता संजय म्हैसाळ यांनी चावरिया यांना बसस्थानकाच्या मागील भिंतीजवळ एक व्यक्ती पडलेला असल्याची माहिती दिली.

त्या अनुषंगाने चावरिया, म्हैसाळ आणि गणेश भट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, ती व्यक्ती हालचाल करत नसल्याने तो मृत असल्याची खात्री झाली. मयताचे अंदाजे वय ४० वर्षे असून, शरीराने मजबूत, उंची सुमारे ५.६ फूट, चेहरा लांबट, काळी वाढलेली दाढी, उजव्या हातात लाल धागा, कमरेला करदोळा, अंगात राखाडी पँट, पिवळा फुलबाही शर्ट आणि फिकट हिरव्या रंगाची निकर परिधान केलेला होता. सदरची घटना १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते १३ ऑगस्ट सकाळी ९.३० या वेळेत घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---