---Advertisement---
शेतात खेळताना चिखलात पाय घसरुन दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या. पाईप धरुन बसल्याने मोठी बहिणी बचावली मात्र तिची आठ वर्षोंची लहान बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी (२२ जून) दुपारी सांगवी ( ता. पारोळा) शेतशिवारात ही घटना घडली. बायत्या गुड्डु बारेला (पारोळा, वय ८, रा.महाले ता. सेंधवा) असे मृत बालिकेचे नाव आहे.
दुपारी एक वाजेच्या सुमारास साहबाई पावरा या तीन लहान मुलांना सोबत घेवुन सांगवी येथुन पारोळा येथे आले होते. तर मोठी मुलगी प्रमिला आणि लहान मुलगी बायत्या या दोन्ही बहिणी सांगवी येथे घरी होत्या. कुटुंबातील सदस्य घराबाहेर पडल्यानंतर या दोन्ही बहिणी सांगवी शिवारातील शेतात खेळत होत्या. खेळताना चिखलात पाय घसरल्याने दोन्ही बहिणी विहीरीत पडल्या.
त्या विहिरीतील पाईपाला धरुन प्रमिला ही बसलेली होती. तिची लहान बहिण बायत्या ही तिच्या समोर विहिरीतील पाण्यात बुडाली. तिने आरडाओरड केल्याने शेतात काम करत असलेल्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. पाईप धरुन विहिरीत बसलेल्या प्रमिला हिला त्यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. लहान बहिण पाण्यात पडत्याची माहिती तिने दिली.
त्यानुसार काही तरुणांनी विहीरीत उतरुन गुड्डु या बालिकेचा शोध घेत तिला पाण्याबाहेर वर काढले. त्यानंतर तिला बेशुध्दावस्थेत पारोळा येथे कुटीर रुग्णालयात नेले असता तपासणीअंती डॉक्टरांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मृत घोषीत केले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उपनिरीक्षक अमोल डुकले तपास करीत आहेत.