Breaking : अमळनेर येथील दोघा भावंडांचे रशियातील वोल्कोव्ह नदीत सापडले प्रेत : खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा

जळगाव : रशियात शिक्षणासाठी गेलेल्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा वोल्कोव्ह नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी घडली होती. तीन विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी हे अमळनेर येथील रहिवासी आहेत. तर तिसरा विद्यार्थी भडगावचा होता. जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल देसले अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. चार पैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा दुर्घटनेच्या दिवशी मृतदेह सापडला होता. तर अमळनेर येथील इस्लामपुरा भागातील 20 वर्षीय जिशान अशपाक पिंजारी व त्याच्या आत्याची मुलगी 20 वर्षीय जिया फिरोज पिंजारी हे बेपत्ता होते. आता बेपत्ता जिशान अशपाक पिंजारी व जिया फिरोज पिंजारी यांचा मृतदेह सापडला आहे.

यासंदर्भात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांनी राजदूत यांच्याशी संपर्क केला याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा केला. खासदार स्मिता वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या वोल्कोव्ह नदीत वाहून गेलेले अमळनेरचे दोघे जिशान आणि जिया यांची प्रेते मिळाली आहेत. स्मिता दिल्लीत असून त्यांनी लागलीच राजदूतांशी संपर्क केला होता. सतत पाठपुरावा असल्याने राजदूतांनी अमळनेरच्या विद्यार्थ्यांचे प्रेत येण्यासाठी गुरुवार उजाडु शकतो असे स्मिता वाघ यांनी सांगितले. पोस्टमार्टेम आणि न्यायालयीन प्रक्रिया असा वेळ जाणार असल्याने शव मिळण्यास उशीर होईल असे सांगण्यात आले.
४ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास जिशान, जिया आणि भडगाव येथील हर्षल संजय देसले, मुंबई येथील गुलाम गोस मलिक हे चार विद्यार्थी शहरातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरायला गेले होते.