---Advertisement---

सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या जळगावात काय आहेत आजचे दर ?

---Advertisement---

जळगाव ।  जळगावात सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. गुरुवारी, २४ कॅरेट सोन्याचा दर ४०० रुपये प्रति तोळ्याने वाढला, ज्यामुळे आज शुक्रवार सकाळी ७८,७०० रुपये प्रति १० ग्रॅम (विना जीएसटी) पर्यंत पोहोचला आहे.

चांदीच्या दरातही १००० रुपयांची वाढ झाली असून, आता एक किलो चांदी ९६,००० रुपयांवर पोहोचली आहे.  या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात महत्त्वपूर्ण वाढ झाली आहे.

चार दिवसांमध्ये सोन्याचा दर २,१०० रुपये प्रति तोळा वाढला आहे, तर चांदी ३,००० रुपये प्रति किलो महागली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोने ७६,६०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९३,००० रुपये प्रति किलो होती.

जागतिक बाजारातील वाढत्या सोने दरामुळे भारतीय बाजारपेठेतही याचा परिणाम दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील घडामोडी आणि आर्थिक स्थितीचा मोठा परिणाम या धातूंच्या दरावर होऊ शकतो. त्यामुळे वर्षअखेर सोने ८५,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या टप्प्यावर पोहोचेल का, हे देखील पाहणे महत्त्वाचं ठरेल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment