घरकुलच्या हप्त्यासाठी १० हजारांची लाच, कंत्राटी अभियंत्यासह खासगी पंटरला अटक

---Advertisement---

 

जळगाव : प्रधानमंत्री घरकुल योजनेचे दुसऱ्या टप्प्यात बांधकामासाठीचा दुसरा हप्ता जमा करावा, यासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी करीत मोबाईल फोन पे द्वारे स्वीकारण्यास होकार देणाऱ्या धरणगाव पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) व खासगी पंटर सागर शांताराम कोळी (वय ३०, निंभोरा, ता. धरणगाव) या दोघांविरोधात लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांनी मंगळवारी कारवाई केली.

तक्रारदार धरणगाव तालुक्यातील रहिवासी असून, त्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर आहे. योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या ग्रामीण खात्यावर ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जमा झाला आहे. त्यानुसार घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यानुसार दुसऱ्या हप्त्या अनुदानासाठी तक्रारदार यांनी पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता गणेश संभाजी पाटील यांची भेट घेतली.

मात्र कंत्राटी अभियंता गणेश पाटील याने निधी शिल्लक नसत्याचे कारण पुढे केले. मात्र गावातील लोकांनी अनुदानाचा हप्ता आल्याचे सांगितल्याने तक्रारदार याने ८ जुलै २०२५ रोजी अभियंता गणेश पाटील यांची भेट घेतली. यावेळी गणेश पाटील याने घरकुल अनुदानाच्या लाभासाठी १० हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली.

यावरून तक्रारदारानेजळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १४ जुलै २०२५ तक्रार केली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. दरम्यान, लाच मागणी केल्याचे समोर आले व १४ जुलै रोजी खासगी पंटर सागर कोळीच्या मोबाईल फोन पेवरून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. मात्र संशय आला. म्हणून गणेश पाटीलने लाच स्वीकारली नाही. परंतु लाच मागणीचा अहवाल समोर आला होता.

त्यानुसार धरणगाव पंचायत समितीचा गृहनिर्माण कंत्राटी अभियंता गणेश पाटील आणि खासगी पंटर सागर कोळी या दोघांना ३ डिसेंबर रोजी सायंकाळी लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, योगेश दुसाने, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे आदींच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---