लाच भोवली : मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, लाचखोरांमध्ये खळबळ

जळगाव : वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी ५ हजारांची लाच स्विकरतांना मंडळ अधिकाऱ्यास जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्यामुळे या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामानंद पोलीस ठाण्यात मंडळ अधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. किरण खंडु बाविस्कर (47 ) असे लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय प्रिपाळा येथे 16 मे 2024 रोजी वडिलांचे व आत्या भावाचे नाव कमी करून आईचे नाव 7/12 उताऱ्यावर लावण्यासाठी अर्ज केला होता. यानंतर तक्रारदार यांनी 20 मे 2024 रोजी तलाठी कार्यालयात याप्रकाणा संदर्भात चौकशी केली. यावेळी मंडळ अधिकारी किरण खंडु बाविस्कर यांनी 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 10,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी यासंदर्भात 27 मे /2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंध जळगाव कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार पडताळणी केल्यानंतर गुरुवार 6 जून 2024 रोजी सापळा रचण्यात आला.

पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी 27 मे 2024 रोजी केली असता मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यांनी 5000/ रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 6 जून 2024 रोजी किरण बाविस्कर यांना 5 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांचेवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

यांनी केली कारवाई 

ही कारवाई तपास अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पी.एस.आय. दिनेशसिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने यांच्या पथकाने सापळा रचला होता. त्यांच्या पथकात पोनि एन.एन. जाधव ,पी.एस. आय.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे यांनी केली. १