---Advertisement---

दागिने बनविण्यासाठी सोने घेत मेहुण्यास तीन कोटी रुपयांचा चुना, नंदुरबारच्या शालकाविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

---Advertisement---

नंदुरबार येथील सराफ पेढीवर दागदागीने बनविण्यासाठी मेहुण्याकडून वेळोवेळी शालकाने सोने घेतले. हे सोने परत म गिणाऱ्या मेव्हुण्याला शिवीगाळ करत शालकाने दमदाटी करत अंदाजे तीन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (१८ जून) शनिपेठ पोलीस ठाण्यात नंदुरबारच्या सराफावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुनील दिनानाथ सराफ (वय ५५.रा. जळगाव) यांचे येथील सराफ बाजारात दुकान क्रमांक १८४ येथे दिनानाथ आर सराफ नावाचे दागिन्यांचे दुकान आहे. सुनील सराफ यांचा अमित दिलीप सोनार (वय ४५, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) हा शालक आहे. अमित यानी नंदुबार येथे सराफ पेढी टाकली होती.

सन २००८ पासुन ते २०१४ पावेतो त्यानी सुनील सराफ यांचा विश्वास संपादन करत वेळोवेळी दागिने बनविण्यासाठी ६० ग्रॅम ते २५० ग्रॅम या प्रमाणे एकुण ४ किलो शुध्द सोने घेतले. बाजार भावाप्रमाणे या सोन्याची किमत तीन कोटी आहे. सुनील सराफ दिलेले सोने मागण्यासाठी नटुंबार येथे गेले असता शिवीगाळ करत अमित सोनार याननी दमदाटी केली.

विश्वास संपादन करुन फसवणूक केली म्हणून सुनील सराफ यांच्या तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात अमित सोनार यांच्यावर विश्वास करुन सोने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरले. व फसवणूक केली, असा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कावेरी कम लाकर तपास करीत आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेची शिफारस

शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासकामी वर्ग करण्याची शिफारस पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे हा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हेकडे वर्ग होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---