---Advertisement---
बहिणीचा मृत्यू झाला, त्यांनतर बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी भाऊ बँकेत गेला. त्याने बहिणीच्या मृत्यूची सर्व माहिती ही बँक अधिकाऱ्यांना दिली, अनेक वेळा बँकेत जाऊन देखील त्याला बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यास परवानगी नाकारली जायची. ज्यामुळे हतबल झालेल्या भावाने मृत बहिणीचा सांगाडा हा कबरीतून काढून थेट बँकेत नेला.
ही धक्कादायक घटना ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यात घडली आहे. सदर घटना ऐकून सर्वजण थक्क झाले आहे. मृत बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी भाऊ बँकेकडे सतत विनवण्या करत होता. पण बँक कर्मचारी व अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. दियानाली गावचा रहिवासी असलेला जितू मुंडा याने थेट त्याच्या मृत बहिणीच्या कबरीतून सांगाडा काढून हा बँकेसमोर पुरावा म्हणून उपस्थित केला. अनेक वेळा बँकेत जाऊन अधिकाऱ्यांनी त्याला धुडकावलं त्याला सांगितलं की तुझ्या बहिणीला इथे उपस्थित कर मात्र बहिण मृत असल्याने तो हतबल झाला आणि थेट बँकेत मृत बहिणीचा सांगाडाच नेला. कागदपत्र आणि सरकारी नियमांच्या कचाट्यात पडलेला भावाला पाहून अनेक लोकांचे हृदय हेलावलं आहे.
जितू मुंडा याची बहीण कालरा मुंडा हिचं ओडिशाच्या एका ग्रामीण बँकेत खात होतं. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कालरा मुंडाचं निधन झालं. तिच्या पतीचं आणि मुलाचं या आधीच निधन झालेलं होतं. त्यामुळे जितू हा तिचा एकमेव वारसदार होता. जितूच्या बहिणीच्या बँक खात्यात 19 हजार 300 रुपये जमा होते. आणि तेच पैसे काढण्यासाठी जितू हा बँकेत गेला. तेव्हा बँक व्यवस्थापकाने जितूला त्याच्या मृत बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा कायदेशीर वारस असल्याचा पुरावा मागितला. जितू हा अशिक्षित आणि गरीब होता. त्यामुळे त्याला ती प्रक्रिया समजली नाही. मृत्यू प्रमाणपत्र व वारसदार हक्क प्रमाणपत्र मिळवणं त्याला अवघड वाटत होतं. आणि वारंवार तो बँकेत जाऊन त्याला धुडकावलं गेलं त्यामुळे तो हताश झाला.
शेवटी जितूने हार मानली आणि तो थेट गावाच्या स्मशानभूमीत पोहोचला. त्याच्या बहिणीची ज्या ठिकाणी कबर होती. ती कबर त्याने खोदली आणि मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढला. एका कापडात सांगाडा गुंडाळला. आणि तो सांगाडा खांद्यावर घेऊन जितू हा जवळपास तीन किलोमीटर चालत जाऊन ओडिशा ग्रामीण बँकेत पोहोचला. त्याचा हा बँकेपर्यंतचा कडक उन्हातला प्रवास पाहू अनेकांना अश्रू अनावर झाले. आणि ज्यावेळी त्यांनी मृत बहिनीचा सांगाडा हा बँकेत अधिकाऱ्यांसमोर काढला तेव्हा तेथील लोकही थक्क झाले. आणि बँकेत शांतता पसरली. बँकेत जमलेल्या लोकांनी बँक प्रशासनावर रोष व्यक्त केला.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि भाऊ जितू मुंडा यास त्यांनी समजावलं आणि शांत केलं. व बँक अधिकाऱ्यांना त्यांनी आश्वासन दिले की या प्रकरणाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाईल.









