पहिल्यांदाच रविवारी सादर होणार बजेट; निर्मला सीतारामन नवव्यांदा बजेट मांडणार ! काय महागणार ? काय बदलणार ? जाणून घ्या…

---Advertisement---

 

देशाच्या आर्थिक इतिहासात भारतात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. हा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे. एकीकडे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प आहे, तर दुसरीकडे निर्मला सीतारमण यांच्या कारकिर्दीतील सलग नववा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षणानंतर बजेटकडे आत देशाचं लक्ष लागून आहे.

29 जानेवारी 2026 रोजी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर करण्यात आल्यानंतर आता देशभरात अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार का?
मध्यमवर्गाला दिलासा मिळणार का?
कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या महाग होणार?
शेतकरी, महिला, युवक व उद्योग क्षेत्रासाठी काय नव्या घोषणा असतील?
या प्रश्नांची उत्तरं आज संसदेत मिळणार आहेत.

यंदाचा बजेट पहिल्यांदाच रविवारी सादर होणार :

आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आठवड्यातील कामकाजाचा दिवस निवडला जात असे. मात्र भारताच्या इतिहासात प्रथमच रविवारी बजेट सादर होणार आहे. सन 2017 पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरीस मांडला जात होता. मात्र माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलत 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर करण्याची प्रथा सुरू केली होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं वेळापत्रक:

अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली. हे अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार आहे.
▪️ पहिला टप्पा: 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026
▪️ दुसरा टप्पा: 9 मार्च ते 2 एप्रिल 2026
या काळात संसदीय समित्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

बजेट कसं पाहायचं आणि डाउनलोड कसं करायचं ?

अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पाची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वाचकांना बजेटशी संबंधित सर्व कागदपत्रं indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तसेच Union Budget Mobile App वर PDF स्वरूपात पाहता आणि डाउनलोड करता येतील. देशाच्या आर्थिक दिशेला आकार देणारा हा अर्थसंकल्प नेमकं काय देणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---