बुलढाण्यातील एका गर्भवती महिलेच्या गर्भातल्या बाळाच्या पोटातही बाळ असल्याची दुर्मिळ घटना समोर आलीय. जिल्हा रुग्णालयात एक गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. मात्र सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनाही मोठा धक्का बसला. या सोनोग्राफीत महिलेच्या पोटात जे बाळ होतं, त्याच बाळाच्या पोटात आणखीन एक बाळ असल्याचे उघडकीस आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हि महिला ३२ आठवड्यांची गर्भवती आहे. तिची सोनोग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांना समजलं की, महिलेच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या पोटातही बाळ आहे. डॉक्टरांना सुरुवातीला काहीतरी चुकलं असावं असं वाटलं. त्यांनी पुन्हा सहकाऱ्यांना बोलावून महिलेची सोनोग्राफी करून घेतली. तेव्हा पुन्हा सोनोग्राफीत तसाच रिपोर्ट आल्यानं सर्वांना धक्का बसला.
हेही वाचा : जि.प. कर्मचाऱ्याची राहत्या घरात आत्महत्या, तीन जण ताब्यात
महिलेची तपासणी केली तेव्हा तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचं समोर आलं. फिटस इन फिटो असं या घटनेला वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. अतिशय दुर्मिळ अशी ही स्थिती असून आतापर्यंत जगात फक्त २०० अशा केसेस घडल्या आहेत.
हेही वाचा : उधार बिअर मागणे पडले महागात; दुकान मालकाने चौघांसह ग्राहकाला बेदम चोपले!
मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. “फिटस इन फिटो” किंवा “फिटस इन फेटो” अशी स्थिती बाळाच्या पोटात दुसऱ्या बाळाचा अस्तित्व असण्याच्या संज्ञेसाठी वापरली जाते. ही एक अगदी असामान्य आणि गंभीर स्थिती असते, ज्यामध्ये गर्भाशयातील बाळाच्या पोटात दुसरे बाळ समाविष्ट असते.
या प्रकाराच्या घटनांमध्ये बाळाचे वजन, आकार आणि स्थितीवर प्रभाव पडू शकतो, आणि योग्य उपचार घेणे आवश्यक असते. या प्रकारच्या घटनेसाठी वैद्यकीय निरीक्षण आणि नंतरचे शस्त्रक्रिया आवश्यक असू शकतात. जगात अशा २०० केसेस आतापर्यंत सापडल्या असून भारतात ९ ते १० वेळा असं समोर आलंय.