---Advertisement---

म्हसावद येथे दोन मोबाईल दुकानांमध्ये घरफोडी; ६ हजारांचा माल लंपास

---Advertisement---

---Advertisement---

शहादा:  तालुक्यातील म्हसावद गावात कुबेर हायस्कूलजवळ असलेल्या दोन मोबाईल दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.


       निहाल मेहमुद खाटीक (वय २६, रा. गरीब नवाज कॉलनी, शहादा) यांचे म्हसावद येथे ‘रजा मोबाईल शॉप’ आणि ‘जिजाई मोबाईल शॉप’ अशी दोन दुकाने आहेत. गुरुवारी ( ३१ जुलै )रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानांमधून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि इतर वस्तू चोरून नेल्या.


       चोरीला गेलेल्या सामानामध्ये ६०० रुपये किमतीचा SIA Vantage कंपनीचा PRO MINI-2 मॉडेलचा एक मोबाईल, दुरुस्तीसाठी आलेला २ हजार रुपये किमतीचा VIVO कंपनीचा Y-20 मॉडेलचा मोबाईल आणि १,४०० रुपये किमतीचा VIVO कंपनीचा Y-12 मॉडेलचा मोबाईल यांचा समावेश आहे. याशिवाय, २ हजार रुपये किमतीचे चार इअरफोन आणि CRP कंपनीचे पाच बॅटरी चार्जरही चोरट्यांनी पळवले. असा एकूण ६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.


        या प्रकरणी निहाल खाटीक यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०५, ३३४ (१) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---