मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर कारचा भीषण अपघात झाला असून यात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हि दुर्घटना पनवेलच्या हद्दीत घडली. ते पोलिस मुंबईतील विक्रोळी येथील पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. या अपघाताचा तपास रायगड पोलीसकरित आहेत.
पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पोलिस उपनिरिक्षक सुरज चौगुले (55 वर्षे) हे जागीच ठार झाले. सुरज चौगुले हे मुंबईतल्या विक्रोळीमधील पार्क साईट पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. मुंबई-पुणेएक्सप्रेस वे वरून ते पुण्यावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी सुरज चौगुले यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार पहिल्या लेनच्या रेलिंगवर जाऊन जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की ही रेलिंग कारमध्ये घुसली. या अपघातामध्ये सुरज चौगुले गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरज चौगुले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.