जळगाव : शहरातील मोहाडी रोड व लांडोरखोरी उद्यानाजवळ आज (२४ जानेवारी) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. प्रवासादरम्यान एका चारचाकी गाडीला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गुरमीर सिंग हे आपल्या गाडीमध्ये प्रवास करत असताना गाडीने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी परिस्थिती पाहताच तातडीने मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे त्यांना यश आले नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे आग आणखी पसरली नाही.
शॉर्टसर्किटमुळे आग
आगीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून ती शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान,
अशा घटनांमुळे नागरिकांनी गाड्यांच्या नियमित देखभालीसह, आगीशी संबंधित सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.