---Advertisement---
Raver Bribe Case : रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराला लाचेची मागणी केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे छोटे व्यापारी असून, त्यांनी काही शेतकऱ्यांकडून एक लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल खरेदी करून दिल्लीतील व्यापाऱ्यास विकला होता. मात्र शेतकऱ्यांचे पैसे न दिल्याने शेतकऱ्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
या तक्रारीची चौकशी निंभोरा पोलिसांकडे सुरू असताना, पोलीस हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदारास तक्रार अर्जातील रकमेच्या १० टक्के प्रमाणात लाच रक्कम मागितली. याबाबत तक्रारदाराने दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांना माहिती दिली होती.
त्यानुसार पडताळणी करण्यात आली असता, हवालदार पवार यांनी तक्रारदारास चौकशीत मदत करण्यासाठी व गुन्हा नोंद न करण्यासाठी २० हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या बाबत लाच मागणी तक्रार प्रकरणी हवालदार सुरेश पवार यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहे.कॉ. किशोर महाजन, महिला पो.हे.कॉ. संगिता पवार, पो. कॉ. राकेश दुसाने,अमोल सुर्यवंशी,भूषण पाटील यांनी कारवाई केली.









