साहेब, तपास लागला का? गुरांच्या चोरीने हतबल शेतकऱ्यांचा सवाल, पोलिसांचा अनोखा सल्ला

---Advertisement---

 

नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद परिसरात गुरांच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात पुन्हा चार गुरांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, मात्र तपास न करता पोलीस निरीक्षकांनी केवळ ”सीसीटीव्ही कॅमेरे बसावा” असा सल्ला दिला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, सुरक्षा प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

नशिराबाद परिसरातील शेतकरी गुरांच्या चोरीमुळे चिंतेत आहेत. नुतीच चार गुरांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तपासाची विचारणी करण्यासाठी किरण पाटील, मुकेश धनगर, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, आनंद चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी पोलीस ठाण्यात गेले.

मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पीडितांना ” सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा सल्ला दिला. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, केवळ कॅमेरे बसवणे पुरेसे नाही; चोरी पकडण्यासाठी सक्रिय कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले.

दरम्यान, चार गुरांच्या चोरी प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे परिसरातील पशुपालक असुरक्षिततेच्या भावनेत असून, पोलिसांनी निष्पक्ष तपास करून आरोपींना तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---