---Advertisement---

माल साठवण्यास जागा नसल्याचे कारण देत ‘सीसीआय’कडून कापूस खरेदी बंद

by team
---Advertisement---

सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्ह्यात ११ केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अंतर्गत कापूस खरेदीसाठी मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार नोव्हेंबर दरम्यान नोंदणी करीत बहुतांश शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांवर विक्रीसाठी कापूस आणला होता. परंतु मार्चच्या सुरुवातीला सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाडाचे तसेच नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ओटीपी जात नसल्याचे कारण देत भारतीय कापूस महामंडळाने कापूस खरेदी बंद केली आहे.

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सीसीआयच्या ११ केंद्रांवर कापूस खरेदीस सुरुवात झाली होती. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत बहुतांश केंद्रांवर सुमारे दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी नोंदणी केली असून दरदिवशी ४० वाहनोमधून कापूस विक्रीसाठी येत होता. त्यानुसार सरासरी एक हजार ते १२०० शेतकऱ्यांचा कापूस ७ हजार ४७९ आणि ७हजार ४२१ अशा दरानुसार सीसीआय केंद्रांवर खरेदी झाला आहेअजूनही नोंदणी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे फेब्रुवारी अखेर सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. परंतु खरेदी केलेला माल ठेवण्यास जागा नसल्याचे आणि ओटीपी जात नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करत पुन्हा कापसाची खरेदी बंद करण्यात आली आहे.


जिल्ह्यात पाच ते सहा वर्षांपासून कपाशी उत्पादकांची परवड सुरू आहे. कपाशी वाणाच्या लागवडीपासून ते वेचणी हंगाम सुरू होऊन घरात येइपर्यंत हजारो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येतो. परंतु त्यामानाने पांढऱ्या सोन्याला मिळणारा भाव अत्यंत तोकडा कमी आहे. बी-बियाणे, खते यांच्या किमती वाढल्या असून इतर मशागत कामांसाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी तसेच वेचणी १० ते १५ रुपये प्रती किलोदर आहेत. त्यामुळे कपाशीला प्रती क्विंटल ८ ते १० हजार रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांतून मागणी करण्यात येत आहे. तथापि, पांढन्या सोन्यावे भाव अजूनही प्रतीक्विंटल साडेसात हजारांच्या पुढे गेले नाहीत.

एकच केंद्र असल्याने जागेचा प्रश्न

तालुक्यातील कपाशीचा पेरा व येणारे उत्पन्न लक्षात घेता सीसीआयकडून दोन खरेदी केंद्रे असणे गरजेचे आहे. एकच केंद्र असल्याने जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गेल्या चार ते पाच दिवसांपासून कपाशीची आवक ओसरली असल्याचे सीसीआय केंद्राचे ग्रेडर यांनी म्हटले आहे. गेल्या ९६ दिवसांत चाळीसगाव येथे धुळे रोडवरील सत्यम जिनिंग केंद्रावर २८ हजार ५०० तर पाचोरा येथील गिरह रोडवरील गजानन जिनिंग केंद्रावर ६५ हजार तसेच जळगाव केंद्रावर ४१ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. जिनिंगमध्ये कापूस साठविण्यास जागा उपलब्ध नसल्याने खरेदी थांबवली होती. मात्र सद्यःस्थितीत केंद्राबाहेर एकही कपाशीने भरलेले वाहन उभे नाही. खरेदी बंद करण्यात आली आहे.

-अनंत फुंडकर, सीसीआय केंद्र व्यवस्थापक, चाळीसगाव-पाचोरा.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment