Pradhan Mantri Awas Yojana Maharashtra: केंद्र सरकारने २३ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील जनतेस प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठी भेट दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे मंजूर करण्याची घोषणा केली गेली. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले की, “प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.”
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2024-25 आर्थिक वर्षात महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6 लाख 37 हजार 89 घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे जाहीर केले. यामध्ये ग्रामीण कुटुंबांसाठी पक्की घरे बांधणे समाविष्ट आहे, ज्यामुळे राज्यातील गरिबांना त्यांच्या आवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत मिळेल. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत अतिरिक्त 13 लाख 29 हजार 678 घरांचा लक्ष्य महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहे की, प्रत्येक नागरिकाला पक्के घर मिळवून देणे, ज्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात एक पत्र जारी करत सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) 1 एप्रिल 2016 पासून राबवली जात आहे. योजनेचा उद्देश ग्रामीण कुटुंबांना पक्क्या घरांसाठी आर्थिक मदत पुरवणे आहे.
या योजनेंतर्गत, महाराष्ट्रात ६ लाख ३७ हजार ८९ घरे बांधली जाणार आहेत. तसेच, भारत सरकारने २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अतिरिक्त मंजूर केली आहेत, ज्यामुळे राज्यातील गरिबांना पक्के घर मिळवून देणे सुलभ होणार आहे. या योजनेचे अंतिम लक्ष्य १९ लाख ६६ हजार ७६७ घरे बंधने हे असणार आहे. शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले.