---Advertisement---

Central Railway News: मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल

---Advertisement---

Central Railway News: मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या ४ गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक १०१०५ / १०१०६ आणि ट्रेन क्रमांक ०४११६ / ०४११५ या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार, ट्रेन क्रमांक १०१०५ / १०१०६ दिवा-सावंतवाडी रोड-दिवा एक्सप्रेस आता एका अतिरिक्त वातानुकुलीत इकॉनॉमी कोचसह धावणार आहे. १०१०५ दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस (दिवा येथून) दि. १६ जुलै २०२५ पासून धावणार आहे.

तर ट्रेन क्रं. १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस (सावंतवाडी रोड येथून) दि. १५ जुलै २०२५ पासून गाडी सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावेल.

सुधारित संरचनेनुसार ट्रेनला ३ तृतीय वातानुकुलीत इकॉनॉमी, १२ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार आणि १ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.

तर ट्रेन क्रमांक ०४११६ / ०४११५ लोकमान्य टिळक टर्मिनस – सूबेदारगंज – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आता ४ तृतीय वातानुकुलीत इकॉनॉमी आणि ६ शयनयान  कोचसह धावणार आहे.

त्यानुसार, ०४११६ लोकमान्य टिळक टर्मिनस – सूबेदारगंज एक्सप्रेस (लोकमान्य टिळक टर्मिनस येथून) दि. ११ जुलै २०२५ पासून तर ०४११५ सूबेदारगंज – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (सूबेदारगंज येथून) दि. १० जुलै  २०२५ पासून धावणार आहे.  

सुधारित संरचनानेनुसार ट्रेनला ६ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ४ तृतीय वातानुकुलीत इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर कार आणि १ सेकंड सीटिंग आणि सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---