---Advertisement---

Champions Trophy 2025 : चॅपियन्स ट्रॉफीची तारीख, ठिकाण ठरलं, भारत आणि पाकिस्तानच्या लढतीकडे लक्ष

by team
---Advertisement---

Champions Trophy 2025 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अखेर बीसीसीआयच्या (BCCI) निर्णयास मान्यता देत हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शवली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात न पाठण्यावर बीसीसीआय ठाम राहिल्यानंतर, या निर्णयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन हायब्रिड मॉडेलवर करण्यात येईल.

हायब्रिड मॉडेलमध्ये भारताचे सर्व सामने तटस्थ स्थळी खेळले जातील. त्यामध्ये कोलंबो आणि दुबई यांसारख्या स्थळांवर सामन्यांचे आयोजन होईल. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होईल, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, आणि आता त्या संदर्भातील एक मोठी माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 फेब्रुवारी 2025 रोजी सामना होणार आहे. या सामन्याच्या तारखेसाठी जवळपास शिक्कामोर्तब होण्याची माहिती समोर आली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयसीसीच्या हायब्रिड मॉडेलनुसार, भारताचे सर्व सामने तटस्थ स्थळी खेळले जातील, ज्यामुळे या सामन्यांचा आयोजन कोलंबो किंवा दुबई येथे होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1 मार्चला सामना होईल अशी माहिती होती, पण आता या तारीखेत बदल झाला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा पाकिस्तानमध्ये 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 या कालावधीत खेळली जाईल. या स्पर्धेतील 8 संघांमध्ये पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. प्रत्येक गटात चार संघ असतील आणि गटातील दोन सर्वोत्कृष्ट संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

यापूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012-2013 मध्ये शेवटचा द्विपक्षीय सामना झाला होता. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांशी द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत, आणि त्यांचे सामन्य फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच होतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment