---Advertisement---
जळगाव : शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-वाहन) बहुप्रतीक्षित असलेली सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुविधा अखेर जनतेसाठी खुली करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने बहिणाबाई चौधरी उद्यान आणि सागर पार्क येथे उभारलेल्या या दोन चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन नुकतेच आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले.
एकाच वेळी चार इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्याची सुविधा असून प्रत्येक ठिकाणी ३०-३० किलोनॅटत्ते दोन फारत चार्जग मशीन बसविले आहेत. चार्जिंगसाठी २२ रुपये प्रति युनिटप्रमाणे दर आकारणी निश्चित केली आहे.
बहिणाबाई चौधरी उद्यानाजवळील स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाले असताना, सागर पार्क येथील स्टेशन अद्यापही बंद आहे. उद्घाटनाच्या वेळी शहर अभियंता योगेश बोरोले, विद्युत विभागाचे प्रमुख संदीप मोरे, योगेश वाणी व इतर अधिकारी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात बहिणाबाई उद्यानाजवळील स्टेशन तयार असूनही ते जनतेसाठी खुले झाले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली आहे. महापालिकेने उपलब्ध केलेल्या या सुविधेमुळे ई-वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.









