---Advertisement---
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यांच्यासह इतर चार जणांच देखील निधन झालं. राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना आपल्या सहकाऱ्याप्रती श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतलेला आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री स्वतः कुठलाही प्रचार करणार नाहीत. अजित दादांच्या सन्मानार्थ त्यांनी राज्यातल्या 22 प्रचारार्थ सभा ह्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातल्या 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीसाठी राज्यात एकूण 22 सभा या फडणवीस यांच्या आयोजित करण्यात आलेल्या होत्या व पुढच्या सात दिवसात त्यांचं 22 सभांचे नियोजन करण्यात आलं होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि वैयक्तिक दुःखवठा त्यांनी लक्षात घेतला व मुख्यमंत्र्यांनी प्रचारापासून दूर राहण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि या प्रचाराची जबाबदारी आता स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांवर त्यांनी सोपवली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर निवडणूक वेळापत्रकात बदल..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखावटा जाहीर करण्यात आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदानांच्या तारखांमध्ये ही बदल केला आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या 5 फेब्रुवारी रोजी होणार होत्या त्या आता 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्यामुळे उमेदवारांना आता 5 फेब्रुवारी पर्यंत प्रचारासाठी वेळ मिळणार आहे तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी ही पार पडणार आहे.









