---Advertisement---

मुलांनी, आई-बापाच्या कष्टांचा आदर करावा : वसंत हंकारे

by team
---Advertisement---

कासोदा : “मुलं आई-बापाच्या कष्टांची कधी कल्पनाही करत नाहीत. मुलगी सासरी जाताना आई रडते, पण बाप मनातल्या मनात खूप रडतो, हे तुम्ही कधी पाहिले आहे का?” असे भावनिक आवाहन प्रसिद्ध व्याख्यानकार वसंत हंकारे यांनी कासोद्यातील क. नं. मंत्री विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित व्याख्यानात केले.

दि. १७ जानेवारी २०२५ रोजी कासोदा पोलीस स्टेशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर होत्या.

श्री. हंकारे यांनी आपल्या भाषणात आई-बापाच्या कष्टांवर, मुलांवरील त्यांचं प्रेम आणि त्यांचे त्याग यावर महत्त्वपूर्ण विचार मांडले. विशेषत: मुलीच्या सासरी जाण्याच्या वेळी बापाच्या मनातील भावनांचा त्यांनी उलगडा केला आणि मुलांना आई-बापाच्या कष्टांची कदर करण्याची अपील केली.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थितांनी प्रतिसाद दिला, आणि पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला स्तुत्य प्रतिसाद मिळाला.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment