---Advertisement---

चीनचा अंतराळातही कावेबाजपणा, जगाला अंधारात ठेवून ॲक्टिव्ह केला उपग्रह

---Advertisement---

चीन हा पळवापळवी आणि लपवाछपवी करणारा देश म्हणून कुप्रसिद्ध आहे. सीमेवर, समुद्रात कावेबाज हालचालींसाठी असलेल्या चीनने अवकाशात सोडलेला उपग्रह तब्बल सहा दिवस जगापासून लपवून ठेवला. अखेर अमेरिकेला त्याचा माग मिळाल्याने चीनच्या अंतराळ मोहिमेतील गुढ पाऊल जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

३ जुलै २०२५ रोजी चीनने शियान-२८बी ०१ नावाचा एक रहस्यमय उपग्रह झिचांग सॅटेलाईट सेंटरवरून सोडला. वास्तविक पाहता अवकाशात प्रक्षेपित केल्यानंतर साधारणतः २४ ते ४८ तासांमध्ये उपग्रहाची माहिती मिळते. या उपग्रहाचे सिंग्नल मात्र, तब्बल सहा दिवस कोणत्याही देशाला मिळाले नव्हते.

१४४ तासांपर्यंत या उपग्रहाने कोणतेही सिंग्नल दिले नव्हते. अखेर ९ जुलै रोजी यूएस स्पेस फोर्सच्या स्पेस डोमेन अवेरनेस युनिटने चीनच्या उपग्रहाचा शोध घेतला. शियान उपग्रह मालिका अंतराळ अभ्यासासाठी उपयोगात आणली जात असल्याचा दावा चीन करीत असला तरी उपग्रह लष्करी प्रायोगिक हेतुसाठी वापरले जात असावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे. तसेच चीनने इतक्या कमी कक्षवक्रतेचा वापर कधीच केला नाही. त्यामुळेच चीनच्या हेतूवर शंका येते, असे मत नामवंत अंतराळ तज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी व्यक्त केले आहे.

उपग्रहाचे वर्तन असामान्य

उपग्रहाने जेव्हा उड्डाण केले तेव्हा त्याचा अपेक्षित कोन ३५ अंश एवढा होता जो सामान्य होता. पण ७९४ +७९६ किलोमीटर उंचीच्या कक्षेत फक्त ११ अंस कक्षवक्रता होती जी असामान्य आहे. रॉकेटने अंतराळात तीनवेळा कक्षा बदलून उपग्रहाला कमी कोनाच्या दिशेने वळविले. त्यामुळे उपग्रहाचे वर्तन हे वैज्ञानिक उद्देशापेक्षा रणनीतिक आणि लष्करी हेतुसाठी असल्याचे दिसून येते.

उपग्रहाकडे नासाचे लक्ष

चीनचा बेभरवसा पाहता या उपग्रहाकडे नासाने लक्ष केंद्रित केले आहे. कारण, चीनचा अंतराळ कार्यक्रम हा फक्त चंद्र, मंगळ मोहिमांपुरता मर्यादित नसून याचा उपयोग लष्करी उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो. परिणामी लष्करी असमतोल बिघडू शकतो. हे कक्षवक्र दक्षिण चीन समुद्र आणि हिंदी महासागरावरून जात असल्याने भारतासह चीनच्या शेजारी देशांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---