Cold Wave: अवकाळी पावसामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेल्या थंडीचा पुन्हा जोर वाढला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला आहे. खान्देशातही थंडीचा जोर वाढू लागला असून काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरले आहे. पहाटे आणि रात्रीच्या तापमानात विशेषः घट जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा अधार घेत आहे.
राज्यात यंदा पाऊस लांबल्याने थंडीची चाहूल उशीराने लागली. थंडीची चाहूल लागल्यापासून उत्तर म्हराष्ट्रात थंडीचा जोर दिसून आला. जळगाव, धुळे आणि नाशिकमध्ये राज्यातील निचांकी तापमानाची नोंद देखील करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापुर्वी निर्माण झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटामुळे थंडी गायब झाली होती. अवकाळी पावसाच्या संकटा दरम्याना काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे परिसरात शेतीचे मोठे नुसारान देखील झाले आहे. मात्र आत अवकाळी पावसाचे सावट दूर होत थंडीची पुन्हा चाहूल लागली आहे.
धुळ्यात निचांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमान होते. जळगावातही तापमानात घट झाली असून आज किमान तापमान कमी झाले आहे. थंडीचा जोर वाढल्याने सायंकाळनंतर नागरीक घरीच थांबणे पसंत करीत आहे.
तापमानात अजून घट होणार
हवामान विभागानुसार, राज्यातील काही भागात थंडीचा जोर वाढला आहे. खान्देशात थंडीचा हा जास्त जाणवत आहे. या ठिकाणी काही ठिकाणी कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. सकाळी थंडी वाढत अनेक ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली. अशात खान्देशासह संपूर्ण राज्यात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून किमाना तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होऊ शकते, असा अंदाज देखील वर्तविला आहे.