---Advertisement---
Jalgaon Weather : गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेत ५.४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. या शिवाय जळगावातही रात्रीच्या तापमानात ३ अंशाची घट होऊन पारा ९.४ अंशावर आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात थंडीचा जोर अजून वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
धुळ्यात रविवार आणि सोमवारी गारठा जाणवत होता. तापमानाचा हा पारा आणखी खाली घसरणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्या वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवसात रात्रीच्या तापमानात ३ अंशाची घट होऊन पारा ९.४ अंशावर आला आहे. यंदाच्या डिसेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात वातावरण कोरडेच राहणार असल्याने, थंडीचा जोर अजून वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.









