---Advertisement---
जळगाव : कामावरून कमी केल्याच्या नैराश्यातून एका कंत्राटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश सावदेकर असे आत्महत्या केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव असून, संतप्त नातेवाईकांनी मृतदेह महाविद्यालयात आणून संस्थाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश सावदेकर हे जळगाव शहरातील एका महाविद्यालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांना कामावरून कमी करण्यात आले, यामुळे नैराश्यात येऊन त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह महाविद्यालयात आणून संस्थाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
15 लाख भरल्याचा आरोप
नोकरीत कायम करण्यासाठी 15 लाख रुपये देऊनही कामावरून कमी केल्यामुळे महेश सावदेकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, नोकरीत कायम करण्यासाठी संस्थाचालकांना 15 लाख रुपये दिले होते. मात्र, असे असताना महेश सावदेकर यांना कामावरून कमी केले.
याबाबत संस्थाचालकांकडे विचारणा केली असता संस्थाचालकांनी उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने ते तणावात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप महेश सावदेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.









