मतदार याद्यांमधील घोळ; महापालिका प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात, उमेदवारांनी लावले स्टॉल

---Advertisement---

 

जळगाव : शहर महापालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याने मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या घोळामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. या घोळाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात पाहीले जात आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग रचना अंतीम झाल्यानंतर आता मतदार यादीचे काम सुरू आहे. मनपा प्रशासनाने १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी केली आहे. त्यावर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि आक्षेप मागविण्यात आले आहेत. हरकतीसाठी ‘अ’ आणि ‘ब’ असे दोन अर्ज वैयत्तत्त्रिक स्वरूपात प्रशासनाकडून स्विकारले जात आहे.

मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात


२०११ च्या जनगणनेनुसार मनपा प्रशासनाने लोकसंख्या ग्राह्य धरून प्रभाग रचना अंतीम केली आहे. मात्र त्यानंतरही लोकसंख्या वाढली असून नव्याने मतदारांची नोंदणी देखित झाली होती. काही प्रभागात बदल झाल्याने मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेल्याने नागरीकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच दुबार नावांचीही मोठी संख्या आहे. मनपाकडे पाच हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

प्रभागात लागले उमेदवारांचे स्टॉल


मनपाच्या मतदार यादीत मोठा घोळ असल्याने नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी प्रभागात नाव शोध मोहिमेचे स्टॉल लावले आहेत. प्रभागाच्या मुख्य चौकात स्टॉल लावून मतदारांची नावे शोधण्याचे आवाहनही उमेदवारांकडून केले जात आहे.

विधानसभा काळातील मतदार यादीवरच पुढची निवडणूक


विधानसभा निवडणूक काळात जी मतदार यादी वापरण्यात आली, त्यात झालेली वाढ आणि बदल हे स्विकारून मनपाने मतदार यादी प्रसिध्द केली आहे. यात १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणूक काळात देखील शेकडो मतदारांची नावे गायब झाल्याच्या मोठ्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. मात्र या चुकांचे खापर प्रशासनाने नागरिकांवस्व फोडले होते. आवाहन करूनही मतदार यादीत नाव शोधणे, तपासणी अन् दुरूस्ती करण्याची तसदी मतदारांनी घेतली नाही. परिणामी ऐनवेळी अशा मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

विरोधकांच्या आरोपामुळे उमेदवारांची धाकधूक


विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवरच आक्षेप घेतला आहे. तसेच जोपर्यंत मतदार याद्या अपडेट होत नाहीत तोपर्यंत निवडणुका स्थगित करण्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे. अशा परीस्थितीत जळगावात देखील उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---