---Advertisement---
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय हा जाहीर केला आहे.
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली होती. मात्र सुनिता पवार यांच्या विनंतीला मान देऊन उमेदवारी मागे घेत असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केलं आहे. एकंदरीत राष्ट्रवादीच्या शिष्टाईला यश आल्याचा पाहायला मिळत असून. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मात्र मोकळा झाला आहे. गांधी भवन येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय हा जाहीर केला आहे.
मी आदेशाप्रमाणे आता अर्ज माघारी घेतोय अशी प्रतिक्रिया यावेळी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी दिली आहे. उमेदवारी मागे घ्या असं देखील मल्लिकार्जुन खर्गे यांचे आदेश होते त्यामुळे मी अर्ज माघारी घेतोय मात्र माझे कार्यकर्ते माझ्यासाठी लढले त्यामुळे मला माघार घेताना अत्यंत दुःख होत आहे अशी देखील प्रतिक्रिया आकाश मोरे यांनी दिली आहे.









