---Advertisement---

काँग्रेसला पुन्हा दे धक्का? महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा

by team
---Advertisement---

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. मागच्याच आठवड्यात काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेसला गळती लागली आहे. आता महापालिका निवडणुका तोंडावर आल्या पुन्हा एकदा राज्यात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी राजीनामा देणार आहेत.

येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह पक्षातील अन्य १०० पदाधिकारी येत्या २-३ दिवसात राजीनामा देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गटात अनेक पदाधिकारी प्रवेश घेत आहेत.

काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार

त्यातच काही दिवसांपासून सुरवसे पाटील हे काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार अशी चर्चा रंगली होती. आता या पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसचे १०० पदाधिकारी राजीनामा देणार आहेत. हे सर्वजण दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या आठवड्यात हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment