मुलींना फसवणाऱ्या ठगबाज मेजरला अटक, पुलवामाचा रहिवासी; हिसारमध्ये करणार होता लग्न

---Advertisement---

 

कैथल : लग्नाच्या नावावर तरुणींना फसवणाऱ्या एका ठगबाज आर्मी मेजरला हरयाणातील कैथल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुण मुस्लिम असून तो जम्मूकाश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडून लष्कराचा गणवेश जप्त करण्यात आला आहे. त्याने तो चंदीगडमधून खरेदी केला होता. आरोपी मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वतःला आर्मी मेजर सांगून हिंदू तरुणींना फसवित असे. अटकेच्या वेळी तो ज्या तरुणीशी लग्न करणार होता तिला भेटायला हिसारमध्ये जात होता.

याप्रकरणी पोलिस चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आतापर्यंत आरोपीने १० पेक्षा अधिक तरुणींना मेजर बनून फसवले असल्याचे उघड झाले. हिसारमधील एका तरुणीकडून त्याने ३० हजार रुपयेही लुटले होते. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस तरुणाची चौकशी करीत आहेत. त्याच्याशिवाय या गुन्ह्यात कोण-कोण सामील आहे, याचाही शोध घेतला जात आहे. त्याची पृष्ठभूमी काय आहे आणि त्याच्या कुटुंबात कोण आहे.

असा झाला भंडाफोड

कैथल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख मेहराजुद्दीन आझम, रा. अवनीपुरा गाव, जि. पुलवामा, जम्मू-काश्मीर अशी झाली आहे. कैथलमध्ये तितराम चौकात पोलिसांनी तपासणीसाठी एका ओला कॅबला थांबवले. कॅबमध्ये बसलेल्या तरुणाची चौकशी केली असता त्याने आपले नाव निशांत सहारन सांगितले. जेव्हा तरुणाला विचारले की, तो काय करतो, तेव्हा त्याने बॅगेतून लष्कराची वर्दी दाखवत सांगितले की, तो आर्मीमध्ये मेजर आहे.

खाक्या दाखवताच म्हणाला, मी मेहराजुद्दीन !

पोलिसांनी त्याला कॅबमधून बाहेर बोलावून त्याची पोस्टिंग, रेजिमेंट आणि कागदपत्रे इत्यादींबद्दल चौकशी केली असता, तो कोणतेही उत्तर देऊ शकला नाही. व्यवसायाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे दाखवू शकला नाही. कठोर चौकशी केल्यावर त्याने आपले नाव मेहराजुद्दीन आझम असे सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---