---Advertisement---

Jalgaon News: गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांवर धडक कारवाई

by team
---Advertisement---

जळगाव : महसूल विभागाच्या व पोलीस प्रसासनाच्या संयुक्त पथकाने मोहाडी- धानोरा  शिवारात वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे. पथकाने हि कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धानोऱ्यातील गिरणा पात्रात केली. या कारवाईत ८ वाहनांना जप्त केले आहे. ज्यात  ४ ट्रॅक्टर, २ डंपर, २ हायवा ट्रक वाळूसह जप्त करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी विनय गोसावी, डी.वाय.एस.पी. संदीप गावीत, तहसीलदार शीतल राजपूत, तालुका पोलीस स्टेशनचे संजय गायकवाड यांनी महसूल, तालुका पोलीस स्टेशन व शीघ्रकृती दलाचे जवानांचे एक पथक या कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले होते.

हेही वाचा : जि.प. कर्मचाऱ्याची राहत्या घरात आत्महत्या, तीन जण ताब्यात

दरम्यान, या पथकाने धानोऱ्यातील गिरणा नदीच्या पात्रातून काही वाहने जप्त केली. तसेच उपसा केलेल्या वाळूचा बेकायदा साठा देखील कारवाईत ताब्यात घेण्यात आला आहे. जप्त केलेली वाहने वाळूसह महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या मोहिमेमुळे वाळू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल व पोलिस विभागाच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. अवैध वाळू उपशावर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. अवैध वाळू उपशावर आळा घालण्याच्या दृष्टीने मोठी कारवाई मानली जात आहे.

 

.

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment