---Advertisement---

Crime News: दारु पिण्यासाठी पैशांची मागणी तरुणाला मारली काचेची बाटली

by team
---Advertisement---

Jalgaon Crime News:  जळगाव शहरांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. अश्यातच एक बातमी समोर आली आहे, दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने काचेची बाटली मारुन व्यावसायिकाला जखमी केले. बुधवार, २८ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनीत ही घटना घडली. शेख वाजीद शेख अय्युद  हा तरुण सिंधी कॉलनीत चायनिज दुकानावर नूडल्स घेण्यासाठी आला. यावेळी वाजीद याच्या परिचयातील सोनू सलिम कुरेशी

हा सिंधी कॉलनीतील भाजीपाला विक्रीच्या गेटजवळ उभा होता. शेख वाजीद याला पाहिल्यानंतर सोनू हा त्याच्याजवळ आला. मला दारू प्यायला पैसे दे, असे म्हणत त्याने पैशांची मागणी केली. माझ्याजवळ आता पैसे नाहीत, त्यामुळे देवू शकत नाही, असे वाजीद याने सांगितले. याचा राग येवून सोनू याने काचेची बाट मारत कानाला, गालावर दुखापत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहेत

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment