---Advertisement---
Crime News: जळगाव शहरातील एका भागातील ३३ वर्षीय महिलेवर भुसावळ शहरातील दोन लॉजमध्ये अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संशयीत आरोपीने पीडितेच्या मुलांना रेल्वे रूळावर टाकून मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात विनोद इंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या मुलांना रेल्वेखाली ठार मारण्याची धमकी देत अत्याचार जळगाव शहरातील एका भागात ३३ वर्षीय पीडिता आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ दरम्यान पीडीतेच्या मुलांना रेल्वे रूळावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकी संशयित आरोपी विनोद इंगळे याने महिलेला दिली व भुसावळातील सुरभी लॉज आणि खडका चौफुलीवरील हॉटेल यशोदा येथे वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेला तक्रारीत केला आहे.
पीडितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी विनोदी इंगळे याच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.
---Advertisement---