---Advertisement---
कासोदा : गावाजवळील जवखेडेसीम येथे जुगाराचा डाव रंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पथकाने छापेमारी करीत १५ संशयितांच्या मुसक्या बांधल्या व त्यांच्याकडील एक लाख २१ हजार ३९० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कासोदा पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक निलेश दिवाणसिंग राजपूत यांना जवखेडेसीम गावातील गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला काही संशयित जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली व त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.
यानुसार पोलिस पथकाने विरभान श्रावण भील (वय ४०), सोनू धाकू भील (वय ५०), राहुल संतोष सोनवणे (वय २६), संतोष माधव सोनवणे (वय ३९), प्रवीण वसंत सोनवणे (वय ३९), सुनील दगा ठाकरे (वय ३५), संतोष माधव सोनवणे (वय ३०), रतन धाकू भील (वय ६०), मंगीलाल भाईदास चव्हाण (वय ४५), अशोक गोविंदा पाटील (वय ५४), सचिन बापू पवार (वय ३७), कांतीलाल महादू सोनवणे (वय ३८), उत्तम बालाआप्पा जेहे (वय ५०), समाधान बापू पाटील (वय ३५), संभाजी महारु पाटील (वय ५८), सुनील सीताराम बाघ (वय ४८, सर्व रा. जवखेडेसीम) यांना रोकड व दोन दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा सहाय्यक निरीक्षक निलेश राजपुत, हवालदार नंदलाल परदेशी, नाईक प्रदीप पाटील, कॉन्स्टेबल समाधान तोंडे, कॉन्स्टेबल निलेश गायकवाड, कॉन्स्टेबल योगेश पाटील, कॉन्स्टेबल कुणाल देवरे, कॉन्स्टेबल दीपक देसले, कॉन्स्टेबल लहु हटकर आदींच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध धंदे चालकांच्या गोटात भीती पसरली आहे.