---Advertisement---

Crime News : कांदा व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एका कांदा व्यापाऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. यात व्यापाऱ्याची २ लाख १७ हजाराची फसवणुकी झाली आहे. याप्रकरणी भावनगर येथील कांदा व्यापारी सुनील शांताराम पंजाबी याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा

शेतकरी व कांदा व्यापारी असलेले सुरेश वसंत पाटील (अहिरे) हे साईबाबा कॉलनी पिंपळनेर येथे राहतात. त्यांनी खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती देशशिरवाडे येथून वेळोवेळी कांदा व्यापारी सुनीलभाई शांतारामदास पंजाबी मे.देव ओनियन ट्रेंडिंग कंपनी व हर्ष टेंडर्स मार्केट यार्ड भावनगर गुजरात येथील व्यापाऱ्याला विकला होता. हा व्यवहार ९ जून २०२३ ते ३० ऑक्टोबर २०२३ दरम्यान झाला. यात व्यापाऱ्याने १८ लाख १६ हजार ६७१ रुपये किमतीचा कांदा घेतलेला होता. या रकमेपैकी संशयित व्यापारी सुनील पंजाबी याने सुरेश पाटील यास १५ लाख ९९ हजार ६७१ रुपये परत केले. परंतु, उर्वरित २ लाख १७ हजार रुपये आरोपीकडे बाकी होते. असल्याने ही रक्कम व्यापाऱ्यांकडून मिळाल्यानंतर पिंपळनेर येथील कांदा व्यापारी सुरेश पाटील यांच्या बॅंक खात्यात टाकतो असे आश्वासन दिले होते. यानुसार सुरेश पाटील यांनी सुनिलभाई पंजाबी यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून बरेच दिवस पैशांची मागणी केली नाही. त्यावरून सुरेश पाटील यांनी २७ जानेवारी २०२४ रोजी संशियत व्यापाऱ्याला फोनवर संपर्क साधला असता ८ दिवसांत पैसे परत करतो असे सांगितले. परंतु, पैसे आजपर्यंत कांदा व्यापारी सुरेश पाटील यांना पैसे परत केले नाहीत. ही रक्कम बुडविण्याच्या व लबाडीच्या इराद्याने आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने ही रक्कम परत केली नाही.


संशयित व्यापारी सुनीलभाई शांतारामदास पंजाबी यांच्या विरोधात सुरेश पाटील यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मालचे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment