Crime News : विवाहित असून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवणे तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन संशियितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिनू रायदास असं मृत तरुणाचं नाव आहे. बिनू हा एका पायाने अपंग होता. रंगकाम करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. ६ वर्षांपूर्वी शेजारच्या गावातील मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला दोन मुली होत्या. सासरच्या गावी कामानिमित्त ये-जा करत असतांना त्याचे तेथील एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले.
या प्रेमसंबंधातून त्यांची अनेक वेळा भेट देखील झाली होती. या प्रकाराबद्दल मुलीच्या कुटुंबियांना माहिती झाल्यानंतर त्यांच्या मनात बिनूबद्दल राग होता. दरम्यान रविवारी सकाळी बिनू हा नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेला. त्यानंतर मैत्रिणीने त्याला फोने करून आपल्या गावी बोलावून घेतले. काम संपवून रात्री बिनू मैत्रिणीच्या घरी पोहचला. याची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाली.
बिनू मैत्रिणीच्या घरी गेला असता तिच्या कुटूंबियांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत बिनू याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बिनूच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे, सत्येंद्र विश्वकर्मा, त्यांची पत्नी बचोल देवी, मुलगा अजय, मुलगी रोली देवी, सुनीता, पंकज आणि दोन अनोळखी व्यक्तींसह आठ जणांविरुद्ध गाजीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.