---Advertisement---

Crime News : दामदुपटीच्या आमिषाने महिलांना गंडा, चाळीसगावात बहीण-भावाविरोधात गुन्हा

by team
---Advertisement---

चाळीसगाव : शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास एका महिन्यानंतर रक्कम दुप्पट करून देतो व शासनातर्फे महिलांना दिले जाणारे आर्थिक साह्य करणारे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी पद देतो, असे आमिष दाखवून अनेक महिलांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी जी. के. देशपांडे उर्फ अक्षय दशवंत व त्याची बहीण या दोघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

असे आहे फसवणूक प्रकरण

अनिता आनंद गवळी यांच्या फिर्यादीनुसार, ६ जानेवारी २०२५ रोजी युवराज सदन राखुंडे यांच्या चहाच्या दुकानावर एक अंध व्यक्ती जी.के. देशपांडे उर्फ अक्षय दशवंत या नावाच्या व्यक्तीशी व त्याची बहीण (नाव माहीत नाही) यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही दत्तू वाणी, देवकर मळा चाळीसगाव येथे भाड्याने खोली केली आहे. श्रीराम जानकी वैद्यकीय कुंज फाउंडेशनमार्फत समुपदेशक म्हणून काम करतो व बेरोजगार महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही सहकार्य म्हणून तुम्हास मदत करू, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये ही संस्था कार्यान्वित असत्याची माहिती देत मला संस्थेच्या पदाधिकारी म्हणून नियुक्ती करीत असल्याचे सांगितले.  त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत पुणे येथे यावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर १६ जानेवारी रोजी जी.के. देशपांडे उर्फ अक्षय दशवंत व त्याची बहीण यांनी मला सांगितले की, आम्ही शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवितो एक महिन्यानंतर तुझे पैसे दुप्पट करून देतो. असे आमिष दाखवून ४० हजार रुपये त्यांना दिले. त्यानंतर २१ रोजी आमच्या संस्थेची मिटींग, नाशिक येथे असल्याने मला त्यांच्या बॅगा धरण्यासाठी नाशिक येथे रेल्वे स्टेशनजवळील नालदा हॉटेल येथे घेऊन गेले. या ठिकाणी त्यांनी दोन रूम बुक केले. तीन-चार दिवसानंतर त्यांना एक इसम भेटावयास आला. त्यांच्यात काय बोलणे झाले ते मला माहीत नाही, परंतु त्यांनी आमची मिटींग झाली, असे सांगितले. पाच ते सहा दिवस झाल्यानंतर मी त्यांना सांगितले की, मी आता चाळीसगाव येथे जात आहे. त्यानंतर मी त्यांचा मोबाइलवर फोन लावून पाहिला असता त्यांचा फोन लागला नाही. त्याचवेळी खात्री पटली की त्यांनी माझी फसवणूक केली.

अनेक महिलांना गंडा

संशयितांनी चाळीसगाव शहरातील जिजाबाई भगवान पाटील, कलाबाई युवराज राखुंडे, उज्ज्वला युवराज राखुंडे व इतर अनेक महिलांनासुध्दा शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळवून देतो, असे आमिष दाखवून प्रत्येक महिलेकडून दोनशे रुपये घेऊन त्यांचीसुध्दा फसवणूक केली. ६ ते २७ जानेवारीपावेतो चाळीसगाव शहरात लक्ष्मीनगर देवकर मळा भागात अंध व्यक्ती जी. के. देशपांडे उर्फ अक्षय दशवंत या नावाच्या व्यक्तीविरुद्ध व त्याची बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment