---Advertisement---

Crime News : शहादा येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस, न्यायालय आवारात चोरी करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात

---Advertisement---

Crime News : शहादा शहरातील एका हायस्कूल परिसरात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रकाश विजय पावरा, (वय ३०), रा. तोरणमाळ, ता. धडगाव जि. नंदुरबार हा संशयितरित्या फिरतांना मिळून आला. त्यास थांबवून विचारपुस केली असता तो गोंधळल्यासारखी उत्तरे देऊ लागला. त्याचेवर अधिकाचा संशय बळावल्याने त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने मागील काही महिन्यांपूर्वी शहादा शहरातील कोर्ट आवारात असलेल्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली असल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकरी यांना सक्त पेट्रोलींग करुन गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकातील अंमलदार यांना जिल्ह्यातील आपआपले बीट प्रमाणे हद्दीत वेळोवेळी पेट्रोलींग करण्याच्या सक्त सूचना केल्या.

शहादा शहरात पेट्रोलींग सुरू अस्तांना शहादा पोलीस ठाणे हद्दितील फिर्यादी किशोर धोंडू बाविस्कर, व्यवसाय कोर्ट शिपाई, रा. नितीन नगर, महावीर हॉस्पीटल जवळ, शहादा जि. नंदुरबार हे आपले कोर्ट परिसरात कर्तव्य करत असतांना सकाळचे सुमारास न्यायाधीश क्वार्टर्स जवळील एका घराचे घराचे लोखंडी कुलूप तोडुन अज्ञात इसमाने चोरी करण्याचे उद्देशाने घरफोडी केली होती.

याप्रकरणी शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याबाबत ताब्यातील आरोपी नामे प्रकाश विजय पावरा याने कबूली देऊन घटनाक्रम सांगितला. तसेच गुन्ह्यातील माल विकुन त्याचे मिळालेले पैसे खर्च केले असलेबाबत माहिती दिली. हा सराईत आरोपी रेकॉर्डवरील असून त्याचेवर शहादा पोलीस ठाणे येथे एकूण ५ वॉरंट आहेत.

त्याच्यावर खेतीया, पानसेमल, अमळनेर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून आरोपीला शहादा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पो.ना. पुरुषोत्तम सोनार, विकास कापूरे, मोहन ढमढेरे, पो.शि. शोएब शेख, सतीश घुले यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---