---Advertisement---

सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत होता कुलदीपसिंग, गस्ती पथकाने उचलून नेले पोलीस ठाण्यात

---Advertisement---

---Advertisement---

पाचोरा : सुरा अन् चिमटे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी ( वय- २३ वर्षे, रा. कजगांव, ता.भडगाव) याच्याकडून घरफोडीचे साहित्य लोखंडी , एक लोखंडी टी आकाराचे हत्यार, लोखंडी कात्री हस्तगत करण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने दोन ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२(क) सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी (२० जुलै ) रोजी रात्री ११ वाजेपासून ते सोमवारी ( २१ जुलै ) रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत दरम्यान पोउपनिरी योगेश गणगे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी जारगाव चौफुली येथे सकाळी ३.३० वाजेच्या सुमारास या गस्ती पथकाला पाहून एक व्यक्ती पळत सुटला. पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याची तपासणी करीत अधिक चौकशी केली. या चौकशीत त्याने त्याचे नाव कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे बॅग आढळून आली. या बॅगेतून एक लोखंडी धारधार व अनकुचीदार सुरा, दोन लोखंडी चिमटे, एक लोखंडी टी आकाराचे हत्यार अनकुचीदार, एक लोखंडी कात्री असे घरफोडी चोरी करण्याचे साहित्य मिळुन आले. त्यास पाचोरा पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

---Advertisement---

या पथकात सफौ रणजित पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ कमलेश पाटील, पोकॉ संदिप पाटील,पोकों हरीष परदेशी यांचा समावेश होता. पुढील तपास पोना महेंद्र प्रकाश पाटील हे करीत आहेत. तपासादरम्यान त्याने पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे मोटार सायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किंमतीची मोटार सायकल क्रमांक (MH-19/BV-8763) ही हस्तगत करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ वसीम सलीम शेख हे करीत आहे. तसेच त्याने पाचोरा येथील गिरणा पंपींग रोड येथे एका घरात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या गुन्ह्याचा तपास सफौ रणजित पाटील हे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, योगेश गणगे, सफौ रणजित पाटील, पोहेकॉ राहुल शिंपी, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ. शरद पाटील, पोकॉ कमलेश पाटील, पोकॉ संदिप पाटील, पोकॉ हरीष परदेशी यांनी पार पाडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment