---Advertisement---

Crime News: वडोदरामध्ये पार्किंगचा वाद , तरुणाची हत्या, आरोपी फरार

---Advertisement---

Crime News: किरकोळ भांडणांचे पर्यवसन खुनात झाल्याची धक्कादायक घटना वडोदरा येथे घडली आहे. द अ‍ॅरोज इन्फ्रा सोसायटीमध्ये बाईक पार्किंगवरून झालेल्या भांडणात एका तरुणाची पॅडलने मारहाणकरीत एकला ठार केले केले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदराजवळील भायली येथील द अ‍ॅरोज इन्फ्रा सोसायटीमध्ये भाडेकरू अक्षय कुर्पण याने त्याची बाईक सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. सोसायटीत राहणारा सुशील कुमार नावाच्या व्यक्तीचे यावरून अक्षयशी भांडण उकरून काढले. भाडेकरूंना सोसायटीत गाडी पार्क करू नका असे सांगितल्यानंतर आरोपी सुशीलने अक्षयशी भांडण केले. या भांडणानंतर सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सुशीलने अक्षयला धमकी दिली.

रात्री अक्षय आणि त्याचा मित्र भायली येथील पान पार्लरमध्ये गेले होते आणि परत येत होते. सुशीलने त्याला थांबवले आणि त्याच्याशी भांडण सुरू केले, तेव्हा अक्षय त्याच्या बाईकवरून सोसायटीत आला. त्याने हातात असलेल्या पॅडलने अक्षयच्या छातीवर जोरदार वार केला. मात्र, सुशील पुन्हा वार करण्याच्या तयारीत असतानाच अक्षयच्या मित्र धावत आला. त्याने सुशीलच्या हातातील पॅडल काढून घेऊन ते दूर फेकून दिले. हि घटना घडताच सोसायटीतील रहिवासी आरडा-ओरड करत जमा झाले. दरम्यान, अक्षयची हत्या केल्यानंतर आरोपी सुशील सोसायटीबाहेर पळून गेला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---