---Advertisement---
जळगाव : वेगवेगळ्या क्लृप्ती अंगीकारत सायबर ठग जनतेच्या कष्टाच्या पैशांवर नजर ठेऊन असतात. बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हॅक करत शेतकऱ्याच्या खात्यातून साडेपाच लाखाची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सपर करत सायबर ठगांनी फसवणूक केल्याचा मामला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आला आहे.
३१ वर्षीय तरुण हे शेती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांचे चाळीसगाव येथे सेंट्रल बँकेत सेींग खाते आहे. या खात्याला त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमाक लिंक केलेला आहे. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कोणी तरी ठगाने त्यांच्या या बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल क्रमांक हॅक केला. त्यानंतर त्याने वेळोवेळी वेगवेगळ्या बैंक खात्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करून घेतली. तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपयांच्या रक्कमेवर सायबर ठगांनी ऑनलाईन डल्ला मारला.
शेतकरी जेव्हा बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याचे समजल्यानंतर त्यांना धक्का बसला.
शेतकऱ्याने त्यांच्या खात्यातून ऑनलाईन व्यवहार केला नसताना हा प्रकार घडल्याने फसवणूक झाल्याची त्यांची खात्री झाली. या प्रकरणी तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी (१७ मार्च) अज्ञात बैंक खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतिष गोराडे हे तपास करीत आहेत.
अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन स्केमर पाठविल्यास त्यावर लिंक करु नये. कोणतीही भिती अथवा कोणतीही सुरक्षितता दाखविण्याचे अमिष दाखवून लिंक करा, अशा पध्दतीच्या संदेशावर मुळीच विश्वास ठेऊ नये. बक्षिस अथवा, लाभ प्राप्तसाठी या लिंकवर क्लिक करा, आपली डिटेल माहिती पाठवा, असा मोबाईलवर आलेला संदेश हमखास फसवू शकतो. त्यामुळे आपली माहिती देऊ नये अथवा लिंकवर क्लिक करु नये. कोणी कोणतीही भिती दाखविली अथवा भरपूर फायदा दाखविण्याचे अमिष दाखविले तर त्याला मुळीच थारा देऊ नये. वारंवार असा प्रकार घडत असत्यास सायबर पोलीस ठाण्यात तत्काळ प्रकाराची माहिती द्यावी. कष्टाने कमविलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी खबरदारी घ्यावी.









