जळगाव चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; शिक्षण मंदिरात तोडफोड करून दोन लाखांची रोकड घेऊन पसार!

---Advertisement---

 

जळगाव : एकाच रात्री सहा दुकाने फोडुन सहा लाखांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली असताना पुन्हा चोरट्याने चार स्कूल फोडत रोकड चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांना कोणाचा धाक राहिला नाही, असेच धाडस ते चोरीतून दाखवित असल्याचा प्रत्यय त्यांनी दिला आहे.

जळगाव शहरात वर्धमान सीबीएससी इंग्लिश मिडियम स्कूल आहे. या शैक्षणिक संस्थेला चोरट्यांनी बुधवारी (२६ नोव्हेंबर) रात्री लक्ष्य केले. मुख्य दरवाजाचे व अॅडमिन रुमचे कुलुप तोडुन एन्ट्री केली. मुद्देमालाचा शोथ घेत कागदपत्र, फाईल अस्ताव्यस्त करत रोकड घेत फरार झाले.

त्यानंतर चोरट्यांनी गिरणापंपीग रोडकडे सावखेडा शिवाराकडे मोर्चा वळविला. या परिसरातील जी. एस. रायसोनी पब्लीक स्कूत, विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग शाळा (सावखेडा शिवार गट नंबर २७०) तसेच गुरुकुल कीड्स शाळा याठिकाणी एका पाठोपाठ तीन शाळांत धुडगुस घातला. कार्यालयाचे दरवाजाचे लॉक तोडत कागदपत्र, फाईल्स अस्ताव्यस्त केले. कपाटातील साहित्याची फेकाफेक करत रोकड शोधली. या चारही शाळांतून एकूण १ लाख ९४ हजार रुपयांची रोकड घेत चोरटे पसार झाले.

बुधवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वर्धमान स्कूलचे प्रिन्सीपल आशिष अजमेरा (वय ५३, रा. रिंगरोड, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकार कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे घटनास्थळी रवाना झाले. चारही शाळेत जावुन त्यांनी माहिती जाणुन घेतली. स्कूल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. त्यानंतर फुटेज प्राप्त करण्याला गती दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्याम कुमार मोरे हे तपास करीत आहेत.

एमआयडीसीतील नवीन गुरांच्या बाजार आवारात एका रात्रीत सहा दुकानांना लक्ष्य करत चोरट्यांनी तब्बल सहा लाखाहून अधिक मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी ( २४ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे चोरटे कैद झाले आहेत. फुटेज तसेच तांत्रिक बाबी अभ्यासल्या असता चोरी केल्यानंतर चोरट्यांनी पायपीट करत कालिंका माता चौक गाठला दोन वेगवेगळ्या रिक्षामधुन प्रत्येकी दोघे बसुन अजिंठा चौफुली नंतर बसस्थानकाकडे चौघे मार्गस्थ झाले. येथुन बसने ते पसार झाले. चोरीच्या दोन्ही घटनांमध्ये साम्य कसे? याबाबीं तपासात अभ्यासल्या जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---